
चैतन्य ज्ञानपीठ ही स्वयंसेवी संस्था (ट्रस्ट महा. १५०७/२०१२/ पुणे दि. ९/८/२०१२) म्हणून नोंदणीकृत असून ट्रस्टचे मुख्यालय पुणे येथे आहे. समर्थ विचारांचा प्रसार – प्रचार करण्याचा ध्यास घेतलेली मंडळी या ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत. जांब येथे वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने केले जाते. त्यामध्ये रक्तदानशिबीर, आरोग्य शिबीर, श्रमदानातून पायाभूत सुविधांचा विकास केला जातो. याशिवाय जांब येथे शिक्षण, प्रशिक्षण, प्रबोधन, जागृती या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, समाजबांधणी, संशोधन, चिंतन इत्यादी उपक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यामध्ये स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जातात. लवकरच चैतन्य ज्ञानपीठ येथे भव्य़़ वास्तू उभारण्यात येणार आहे.
ऑनलाइन देणगीसाठी इकडे क्लिक करा.
सकळ देवांचिये साक्षी । गुप्त उदंड भुवने ।
सौख्यात्सी पावने जाणे । आनंदवनभुवनी ।।
त्रैलोक्य चालिले तेथे । देव गंधर्व मानवी ।
ऋषी मुनी महायोगी। आनंदवनभुवनी ।।
महिमा तों वर्णवेना । विशेष बहुतांपरी ।
विद्यापीठ ते आहे। आनंदवनभुवनी ।।
या प्रकारे भूमंडळावर रामराज्य अवतरावे यासाठी ‘देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा‘ या पद्धतीने संपूर्ण समाज ढवळून काढत त्यांच्यात रामभक्तीची, राष्ट्रभक्तीची चेतना जागवित तेजस्वी समाज उभारणीचे कार्य ज्या राष्ट्रसंत समर्थ रामदास यांनी केले त्यांची जन्मभूम म्हणजे ‘जांब समर्थ‘।
याच पवित्र, पावन भूमित त्यांना प्रभू रामचंद्राचे दर्शन घडले. ‘चिंताकरितो विश्वाची ही ध्येय दिशा सापडली.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ, रामदास स्वार्मीचे जन्मगाव, हे बरेचर विकासाच्या दृष्टीने उपेक्षित, दुर्लक्षित असे लहानसे गाव आहे. रामदास स्वार्मीच्या जन्मभूमीस जागतिक प्रेरणा केंदाचे स्थान मिळवून द्यायचे या निर्धाराने चैतन्य ज्ञानपीठ या संस्थेची क्रांतिदिनी म्हणजे दि, ९ ऑगस्ट २०१२ या स्थापना दिनापासूनच वाटचाल चालू आहे.
संपूर्ण मराठवाडा संतांची मांदियाळी आहे. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ अशा अनेक महात्म्यांच्या कार्यकर्तृत्वाची पायाभरणी येथे झाली. प्रत्येक स्थान अत्यंत पवित्र, चैतन्याचे स्फुल्लिंग..त्या सर्वांविषयी आदरभाव बाळगून, ‘चैतन्य ज्ञानपीठा‘ ने जांब समर्थाची आरंभबिंदू म्हणून निवड केली.
पाश्चात्य जडवादी विज्ञान आणि भारतीय अध्यात्मिक चिंतन यांचा सुमेळ साधत उत्तम मनुष्य
घडवावा अशा भावनेतून चैतन्य ज्ञानपीठाने अनेक उपक्रम राबवले आहेत. श्रीराम कृपेने लोकसहभाग
वाढू लागला आणि अशक्यप्राय वाटणारे कार्य सफलतेच्या दिशेने प्रगती करू लागले आहे.
१२ ऑक्टोबर २०१२ रोजी श्री क्षेत्र जांब येथील श्री रामदास स्वामी यांच्या मूर्तीसमोर १३ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम‘ हा मंत्र लिखित स्वरूपात आणि १०८ कोटी मौखिक स्वरूपात पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला गेला आणि २०१५ मध्ये तो पूर्णत्वासही गेला.
२२ व २३ ऑगस्ट २०१५ रोजी पुणे येथे समर्थ भक्तांची ‘राष्ट्रीय परिषद‘ घेण्यात आली. या परिषदेत
अनेक महानुभावांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
याच काळात जांब येथील आनंदी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास चैतन्य ज्ञानपीठाने घेतला आणि संस्थेचे कार्यकर्ते व जलबिरादरी फौंडेशन चे सुनील जोशी नाम फौंडेशन, गावकरी आणि सरकारी यंत्रणा यांच्या मदतीने हे कार्य पूर्णत्वास गेले.
- जपनाम स्तंभ
गुरुकूल पद्धतीचे शैक्षणिक केंद्र • वनौषधींची पुष्पवाटिका
भक्त निवास गावकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी केंद्र संस्थेच्या उपक्रमांसाठी सभागृह
वाचनालय व अभ्यासिका
- समर्थवाड्मय अभ्यासकांसाठी विशेष प्रोत्साहन सुविधा
समर्थ भक्तांना आवाहन:
- चैतन्य ज्ञानपीठाच्या भव्य प्रकल्पामध्ये सहभागी होऊन रूपये ५ लाख किया त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्यांच्या नावे भक्त निवास मधील एका खोलीची उभारणी केली जाईल व देणगीदारासाठी वार्षिक एक महिना निः शुल्क निवास व्यवस्था करण्यात येईल.
याच काळात जांब येथील आनंदी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास चैतन्य ज्ञानपीठाने घेतला आणि संस्थेचे कार्यकर्ते व ‘जलबिरादरी फाउंडेशन‘ चे सुनीलजी जोशी, ‘नाम फाउंडेशन‘, गावकरी व सरकारी यंत्रणा यांच्या मदतीने हे कार्य पूर्णत्वास गेले.
दुष्काळी जांब क्षेत्राचे नंदनवन होण्यासाठी नदी पुनरुज्जीवनाच्या यशस्वी उपक्रमाने फार मोठा हातभार सावला आहे.
२०१६ साली श्रीरामदास स्वार्मीच्या पादुकांची यात्रा गावोगावी काढण्यात आली. जालना, औरंगाबाद, बीड, सांदेड, परभणी, हिंगोली आदि भागातून निघालेल्या या यात्रेस समर्थभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
२५ नोव्हेंबर २०१७ रोजी रामभक्तांचा मेळावा समर्थ जांब येथे पार पडला त्याला गावकऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. परिसरातील २१ शाळांमधून ४५० विद्यार्थी या मेळाव्याला आले होते त्यांनी गल्लखांबासारखी नेत्रदिपक प्रात्यक्षिके सादर केली.”
या मेळाव्यापूर्वी चैतन्य ज्ञानपीठाचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी अनेक स्पर्धा, उपक्रम, फेऱ्या या माध्यमातून प्रयत्न केले गेले.
श्री समर्थ्यांची शिकवण अंगी बाळगण्यासाठी ‘श्रीमद् ग्रंथराज‘ दासबोधाच्या ‘चक्रिपारायणा‘चा उपक्रम चैतन्य ज्ञानपीठातर्फे प्रतिवर्षी चातुर्मासात राबविला जातो. ७०० गटांमधून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे ऑस्ट्रेलिया, दुबई अशा परदेशांतूनही हा उपक्रम चालतो. आता पावेतो सुमारे २०,००० पारायणकर्ते यात सहभागी झाले आहेत. आम्ही रामाचे दास। रामचरणी आमचा विश्वास।। अशा श्रद्धेतून चैतन्य ज्ञानपीठाचे कार्य गतीमान करण्यासाठी ७, ८, ९ डिसेंबर २०१९ रोजी जांब समर्थ येथे ‘समर्थ महासंगम‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन व व्यवस्थापन यामुळे महासोहळा सक्षवेधक झाला. रा. स्व. संघाचे भूतपूर्व सरकार्यवाह गा. भय्याजी जोशी, पूज्यसंत गोविंददेवगिरीजी, पूज्य काडसिद्धेश्वर महाराज, श्री. शरदजी कुबेर, डॉ. विजय लाड, श्री. अविनाश गोहाड, प्रा. दादासाहेब जाधव, मंगलाताई कांबळे अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी, शौर्य प्रात्यक्षिके, भारूड, संतपूजन अशा कार्यक्रमानांही यात स्थान मिळाले होते.
यावेळी एकूण कार्याचा महत्वलक्षी कार्यक्रम म्हणून चैतन्य ज्ञानपीठाच्या वास्तूचे भूमीपूजन मा. भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यातील विशेष उल्लेखनीय बाब याच जागेवर भव्य प्रकल्प उभा करण्याचे निर्धार चैतन्य ज्ञानपीठाने केला आहे व ही जागा समर्थभक्त के, राम कशाळकर यांनी संस्थेला दान केली आहे.
- जपनाम स्तंभ
गुरुकूल पद्धतीचे शैक्षणिक केंद्र • वनौषधींची पुष्पवाटिका
भक्त निवास गावकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी केंद्र संस्थेच्या उपक्रमांसाठी सभागृह
वाचनालय व अभ्यासिका
- समर्थवाड्मय अभ्यासकांसाठी विशेष प्रोत्साहन सुविधा
समर्थ भक्तांना आवाहन:
- चैतन्य ज्ञानपीठाच्या भव्य प्रकल्पामध्ये सहभागी होऊन रूपये ५ लाख किया त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्यांच्या नावे भक्त निवास मधील एका खोलीची उभारणी केली जाईल व देणगीदारासाठी वार्षिक एक महिना निः शुल्क निवास व्यवस्था करण्यात येईल.
.
चैतन्य ज्ञानपीठाच्या गुरु गुरुकूल योजनेमध्ये Each one Teach One या योजनेअंतर्गत एका
विद्यार्थ्यांचा मासिक खर्च रूपये २०००/- किवा वार्षिक खर्च रुपये २५,०००/- देणगी देऊन विद्यार्थ्यांचे
पालकत्व स्वीकारता येईल,