chaitanyadnyanpeeth

चैतन्य साधना अंक

7 मार्च 2021 म्हणजेच दासनवमीच्या शुभ मुहुर्तावर चैतन्य साधना मासिकाचा शुभारंभाचा अंक प्रकाशित करण्यात आला.

तेव्हापासून देशाच्या विकासनीतीशी निगडीत अशा सार्‍यांच विषयातील जसे की, कृषी, अर्थ, विज्ञान, आरोग्य,पायाभूत सुविधा, मानव कौशल्य विकास, रोजगार तसेच सुसंस्कारित आधुनिक पिढीची निर्मिती करणारा मजकूर या मासिकातून वाचकांसमोर ठेवण्यात येत असतो. या अंकातून विकेंद्रित अर्थव्यवस्था, निसर्गप्रेम, स्वावलंबन, श्रमप्रधानता याशिवाय प्राधान्याने संत साहित्यातील चैतन्याचा परिचय करून देणे आदींवर भर दिला जात आहे.

चैतन्य साधना अंक हे चैतन्य ज्ञानपीठाचे मुखपत्र असणारे मासिक असून संपूर्ण महाराष्ट्रात या अंकाचे वितरण केले जाते. चैतन्य ज्ञानपीठाच्या कार्यक्रमाची माहिती वेळोवेळी यातून प्रकाशित केली जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क करा